संस्थेची माहिती

सरस्वती देवी विद्या विकास न्यास ची स्थापना –

सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल परंतु होतकरू व हुशार वियार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला व त्यांच्यातीलसुप्त उपक्रमशीलतेला हातभार लावावा या हेतूने कै. डॉ. शिवराम दत्तात्रय आठवले व त्यांचे वर्गमित्र कै. डॉ. मोरेश्वर दिनकर पराडकर या दोघांनी मिळून १९९२ साली सरस्वती देवी विद्या विकास न्यास ची स्थापना केली.

  • जाती व पंथांचा विचार न करता पात्रतेनुसार गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्व प्रकारची मदत करणे.
  • साक्षरता – प्रसारासाठी मदत करणे.
  • तांत्रिक, व्यवसायिक, प्रथमोपचार, परिचारिका व रुग्णसेवा इत्यादींच्या शिक्षणासाठी व प्रशिक्षणासाठी मदत करणे.
  • नवसमाज निर्मितीचा हेतू ठेवून, खेडे दत्तक घेणे व त्याचा सर्व तोपारी विकासाचा शक्यतो प्रयत्न करणे.
  • तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परत-बोलीवर आर्थिक मदत करणे.
  • गरजू-गरीब विद्यार्थ्यांना शक्यतो औषधोपचारासाठी मदत करणे.

संस्थ्ये तर्फे राबविण्यात येत असलेले शैक्षणिक उपक्रम – 

  • गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालय व शिकवणी  वर्गांचे शुल्क भरतो.
  • शाळेचा गणवेश, पुस्तके, वह्या, मार्गदर्शिका (गाईड्स) कंपास पेट्या, ई. शैक्षणिक साहित्य पुरवितो. वाचनालय चालवितो.
  • सुट्टी मध्ये संस्कार वर्ग घेतो. या संस्कार-वर्गात अभ्यासाव्यतिरिक्त मुलामुलींच्या अंगभूत कलागुणांचा विकास होण्यासाठी कथा-कथन, हस्तकला, चित्रकला, मातीकाम, खात बनविणे, कपड्यांवरील रंगकाम, कराटे, योगा, गायन इ. अनेक विषयांची तोंड ओळख करून देतो.
  • भारताचा तेजस्वी इतिहास, नीतीकथा, थोरांच्या कथा, गोष्टीरूप भगवदगीता, सुभाषिते, पोवाडे, स्फूर्तीदायक गाणी शिकविण्यासाठी तज्ञ व्यक्तींना पाचारण करतो.
  • “संकृतभाषा संस्थेतर्फे” ई ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संस्कृत-शिष्यवृत्ती परीक्षे साठी मुलांची न्यासातर्फे तयारी करवून मुलांना परीक्षेला बसवितो भगवदगीता श्लोक पठण स्पर्धाची सुद्धा तयारी करवून घेतो
  • “स्वावलंबन” योजने अंतर्गत दरवर्षी मुला-मुलींना  स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांच्या आवडीच्या व्यवसायिक किंवा तांत्रिक शिक्षणासाठी साहाय्य करतो.
  • इच्छुक मुला-मुलींना, स्त्री-पुरुषांना दिवाळीचा फराळ मोठ्या प्रमाणावर विक्री साठी कसा बनवावा याचे प्रशिक्षण देतो.
  • संपूर्ण शिवणकामाचे व्यावसायिक प्रशिक्षण देतो.
  • दरवर्षी अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीत पुस्तके प्रकाशित करतो.
  • मुंबई विद्यापीठातून संस्कृत विषय घेऊन B.A. च्या परीक्षेत सर्व प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास / विद्यार्थिनीस डॉ. मो.दि.पराडकर पुरस्काराने दरवर्षी १७ नोव्हेंबर या दिवशी सन्मानित करतो.

संस्थ्येचे मराठी माहितीपत्रक

संस्थ्येचे इंग्रजी माहितीपत्रक