अनाथांच्या माई असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका माननीय सिंधुताई सकपाळ यांना “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झालेला वाचून खूप आनंद झाला. साधारण १८-१९ वर्षांपूर्वी सिंधुताईंच्या कार्यासंबंधीची माहिती माझ्या आईने मला सांगितली होती. मी त्यांना फोन करून त्यांना भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. तेंव्हा फक्त ४ थी इयत्ता शिकलेल्या सिंधुताईंचे वक्तृत्व आणि कर्तृत्व बघून मी आश्चर्यचकित झाले आणि मी लगेच त्यांची मुलाखत घेतली. धर्मभास्करच्या संपादकांनी ती […]
